घरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

0
497

भोसरी, दि.२८ (पीसीबी) – घरात झोपलेल्या अल्पवयीन मुलीवर एकाने मध्यरात्री तिच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. ही धक्कादायक घटना सोमवारी (दि. 27) मध्यरात्री अडीच वाजताच्या सुमारास सदगुरुनगर भोसरी येथे घडली.

शिवराज शंकर मचकुरे (रा. मुचलम, ता. बसव कल्याण, जि. बिदर, कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी तिच्या घरी झोपलेली असताना मध्यरात्री आरोपी मुलीच्या घरात आला. त्याने पीडित मुलीचे तोंड दाबून जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.