घरात घुसून वृद्धाला मारहाण

0
140

घरात घुसून वृद्ध व्यक्तीला मारहाण करण्यात आली. ही घटना बुधवारी (दि. 1) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास वडगाव रोड, आळंदी येथे घडली.

चौरंगनाथ तुकाराम निकम (वय 62, रा. वडगाव रोड, आळंदी) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जयेश भरत गोळे (वय 23, रा. फिरस्ता. मूळ रा. सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या घरी असताना आरोपी जयेश हा जबरदस्तीने घरात आला. त्याने त्याच्याकडील कोणत्यातरी हत्याराने निकम यांच्या डोळ्याच्या वर मारून त्यांना जखमी केले. तसेच त्यांना शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी जयेश गोळे याला अटक केली आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.