घरात घुसून महिलेला मारहाण

0
333

निगडी, दि. ७ (पीसीबी) – घरात घुसून महिलेला महिलेने मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. 6) सकाळी प्राधिकरण निगडी येथे घडली. याप्रकरणी मारहाण झालेल्या महिलेने मारहाण करणाऱ्या महिलेच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने आरोपी महिलेची गाडी ओली केली आणि त्यांच्या मुलीला भिजवले असा आरोपी महिलेचा समज होता. त्यातून ती फिर्यादी महिलेच्या घरात अनधिकृतपणे आली. तिने फिर्यादी महिलेला हाताने मारहाण करून शिवीगाळ करत दमदाटी केली. फिर्यादी यांच्या चष्म्याचे नुकसान केले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.