पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – महिलेच्या घरात जाऊन तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. ही घटना गुरुवारी (दि. 23) सकाळी साडेनऊ वाजता घडली.
याप्रकरणी 31 वर्षीय महिलेने शुक्रवारी (दि. 24) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोशन प्रभाकर ठाकरे (वय 29, रा. किवळे) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घरी असताना आरोपीने तिचा हात पकडून तिच्याशी गैरवर्तन केले. तसेच तिला अश्लील भाषेत बोलून तिचा विनयभंग करून धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
            
		











































