घरात घुसून तरुणीचा विनयभंग

0
216

चाकण, दि. १० (पीसीबी) – तरुणीच्या घरात घुसून तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या तरुणीच्या आई वडिलांना आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना 3 जुलै रोजी दुपारी मेदनकरवाडी येथे घडली.

याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत प्रमोद नाईकरे (वय 29, रा. चास, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी घरी एकटी असताना आरोपी हा तरुणीच्या घरात गेला. तरुणीसोबत गैरवर्तन करून आरोपीने तिचा विनयभंग केला. याबाबत जाब विचारण्यासाठी तरुणीचे आई वडील आरोपीच्या घरी गेले असता त्याने फिर्यादी तरुणी आणि तिच्या आई वडिलांना हाताने मारहाण केली. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.