घरातील सव्वा चार लाखांचे दागिने व साहित्य चोरल्या प्रकरणी थेट पत्नी व सासू वर गुन्हा

0
481

चिंचवड , दि. २१ (पीसीबी) – घरातील साहित्य व 15 तोळे सोने असा एकूण 4 लाख 25 हजारांचा एवज पत्नी व सासूनेच चोरून नेल्याचा आरोप एका ज्येष्ठ नागरिकाने केला आहे. याप्रकऱणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा प्रकार 11 ऑक्टोबर 2022 रोजी पवनानगर,चिंचवड येथे घडली.

याप्रकऱणी भास्कर कारभारी गायकवाड (वय 59 रा.चिंचवड) यांनी रविवारी (दि.20) याप्रकऱणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.यावरून चिचंवड पोलिसांनी फिर्यादींची पत्नी व सासू यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे 11 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी शिवाजीनगर येथील त्यांच्या ऑफीसला गेले होते. या कालावधीत त्यांची पत्नी व सासू यांनी घऱातील 15 तोळे वजनाचे 3 लाख 80 हजार रुपयांचे दागिने तसेच 45 हजार रुपयांचे घरातील सोफा, फ्रीज, टीव्ही, फॅन असे साहित्य चोरून नेले आहे. यावरून फिर्यादी यांनी रविवारी पोलिसांकडे याबबत तक्रार केली आहे. चिचंवड पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.