घरातील दागिन्याबाबत विचारणा केली म्हणून मुलानेच केले आईवर जीवघेणे वार

0
223

चिंचवड, दि. १३ (पीसीबी) – घरातील दागिने कोठे ठेवले, गहाण ठेवले की विकले याबाबत आईने विचारले असता मुलाने थेट चोकुने आईवरच जिवघेणे वार केले आहेत.. ही धक्कादायक घटना रविवारी (दि.11) थेरगाव येथे घडली आहे.

याप्रकरणी आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मुलगा ओंकार ईश्वर बामणे (वय 19 रा. थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चा मुलगा ओंकार याला फिर्यादी यांनी घरातील कपाटातील दागिन्या बाबात विचारणा केली.की तू दागिने विकले की गहाण ठेवले, दागिने कोठे आहेत. सांग नाही तर पोलिसांना बोलवणे अशी विचारणा केली. याचा राग आल्याने आरोपीने थेट घरातील चाकूने जन्मदात्या आईच्या डोक्यावर व हातावर वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.