घराजवळ बोर घेताना वाद; वाल्हेकरवाडीतील महिलेस मारहाण

0
247

वाल्हेकरवाडी, दि. १३ (पीसीबी) – घराजवळ बोर घेताना झालेल्या वादातून नातेवाईकांनी एका महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 10) सकाळी वाल्हेकरवाडी येथे घडली.

दत्ता लक्ष्मण तुपे (वय 40), महादेव दत्ता तुपे, गणेश तुपे, तीन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मारहाण झालेल्या महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या जागेत पिण्याच्या पाण्यासाठी बोर घेत होत्या. त्यावेळी आरोपी नातेवाईक तिथे आले. त्यांनी बोर घेण्यास फिर्यादी महिलेला विरोध केला. त्यावरून फिर्यादीस शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले. तसेच महादेव तुपे याने फिर्यादीच्या मुलीला दगडाने मारून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.