घराच्या उघड्या दरवाजा वाटे मोबाईल फोन आणि कॅमेरा चोरीला

0
249

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – घराच्या उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून चोरट्याने दोन मोबाईल फोन आणि एक कॅमेरा चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 24) सकाळी आठ ते साडेआठ वाजताच्या सुमारास वायसीएम हॉस्पिटल जवळ पिंपरी येथे घडली.

गणेश शत्रुघ्न वागलगावे (वय 19, रा. वाय सी एम हॉस्पिटल जवळ, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा बुधवारी सकाळी आठ ते साडेआठ वाजताच्या कालावधीत उघडा होता. उघड्या दरवाजा वाटे अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातून 20 हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन आणि 20 हजार रुपये किमतीचा एक कॅमेरा असा एकूण 40 हजारांचा ऐवज चोरून नेला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.