घराचा दरवाजा उघडा दिसताच, चोरट्याने डाव साधला…

0
121

रावेत, दि. ०१ (पीसीबी) : उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून चोरट्यांनी लॅपटॉप व मोबाइल चोरून नेले. या घटना रावेत आणि चिंचवड येथे घडली.

पहिल्या घटना सचिन राजेंद्र सकट (वय 22, रा. स्मामी समर्थ बिल्डींग, गुरुद्वाराजवळ, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी सोमवारी (दि. 30) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे साडेतीन ते सकाळी साडेसहा वाजताच्या दरम्यान फिर्यादी यांच्या राहत्या घराचा दरवाजा उघडा असताना अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करीत आतील फिर्यादी व त्यांच्या मित्राचे 44 हजार रुपये किंमतीचे तीन लॅपटॉप व दोन मोबाइल फोन चोरून नेले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

दुस-या घटना ओम योगेश खुणे (वय 19 रा. कामटे निवास, धर्मराज चौक, रावेत) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी पहाटे चार ते सकाळी सात वाजताच्या दरम्यान फिर्यादी यांच्या घराचा दरवाजा उघडा असताना अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचा लॅपटॉप, मित्र बबलु चव्हाण यांचा लॅपटॉप व मोबाइल फोन असा एकूण 75 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. रावेत पोलीस तपास करीत आहेत.