घरभाड्यावरून मालक आणि भाडेकरूंचा वाद परस्पर विरोधात गुन्हे दाखल

0
376

पिंपरी, दि. ११(पीसीबी) – घरभाडे देण्यावरून घर मालक आणि भाडेकरू या दोन कुटुंबात वाद झाला. ही घटना रविवारी (दि. 9) सायंकाळी मोरेवस्ती चिखली येथे घडली. याप्रकरणी परस्पर विरोधात विनयभंग, मारहाण आणि दमदाटीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

31 वर्षीय भाडेकरू महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार घरमालक, त्यांची पत्नी आणि भावाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरमालक आरोपी फिर्यादी राहत असलेल्या खोलीत आले. आमची खोली आजच्या आज खाली करायची, असे म्हणत फिर्यादीस धक्काबुक्की केली. फिर्यादीस शिवीगाळ करून त्यांच्याशी गैरवर्तन करत त्यांचा विनयभंग केला.

याच्या परस्पर विरोधात 31 वर्षीय घर मालकिणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार भाडेकरू दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी त्यांच्या खोलीत भाड्याने राहणाऱ्या आरोपींकडे भाडे मागण्यासाठी गेल्या असता आरोपींनी त्यांना धक्काबुक्की करून पैसे देणार नाही, खोली खाली करणार नाही असे म्हणत शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास चिखली पोलीस करीत आहेत.