घरबसल्या काम शोधताना बसला दीड लाखाचा गंडा..

0
316

चऱ्होली, दि. १६ (पीसीबी) – वर्क फ्रॉम होम ऑनलाईन माध्यमावर शोधत असताना अनोळखी व्यक्तींनी फोन करून महिलेला ऑनलाईन उत्पादने खरेदी करून ऑनलाईन विकायची, अशी स्कीम सांगितली. त्यासाठी महिलेकडून एक लाख ६३ हजार रुपये घेऊन तिची फसवणूक केली. ही घटना २६ आणि २७ एप्रिल रोजी च-होली बुद्रुक येथे ऑनलाईन घडली.

याप्रकरणी २६ वर्षीय महिलेने गुरुवारी (दि. १५) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मोबाईल क्रमांक 639286547860 धारक, पेटीएम 62448613@paytm, 7498053749.imb@icici, ऍक्सिस बँक खाते धारक 921020004749185, [email protected] खातेधारक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घरी बसून काम करता येईल असे वर्क फ्रॉम होम शोधत होत्या. ऑनलाईन माध्यमातून काम शोधत असताना आरोपीने त्यांना संपर्क केला. त्यांना एक लिंक पाठवून त्यावर पेमेंट खाते सुरु करण्यास सांगितले. वोलेटवरील वस्तू खरेदी करायच्या आणि त्या वस्तू तिथेच ऑनलाईन विकायच्या. त्यातून नफा मिळेल असे आरोपींनी फिर्यादी महिलेस सांगितले. फिर्यादी आणि त्यांच्या पतीच्या बँक खात्यातून एक लाख ६३ हजार रुपये पाठवण्यास सांगून आरोपींनी पैसे स्वीकारले. त्यानंतर महिलेची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.