घरफोडी प्रकरणी तिघांवर गुन्हा

0
121

दि. ५ ऑगस्ट (पीसीबी) सांगवी, – दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून चोरट्यांनी 70 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शितोळेनगर सांगवी येथे रविवारी (दि. 4) मध्यरात्री पावणे तीन वाजताच्या सुमारास घडली.

हुकुमसिंग रामसिंग कल्याणी (वय 32, रा. रामटेकडी, सोलापूर), जयपालस पालुसिंग (वय 20, रा. भारतनगर, पिंपरी) आणि त्यांचा एक साथीदार (नाव, पत्ता माहिती नाही) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी हुकुमसिंग कल्याणी याला अटक केले आहे. चंद्रशेखर नारायण खोले (वय 67, रा. शितोळेनगर, जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून रविवारी पहाटे पावणे तीन वाजताच्या सुमारास फिर्यादी चंद्रशेखर खोले यांच्या घराचा कडी कोयंडा उचकटून, कुलूप तोडून आतील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 70 हजारांचा ऐवज चोरून नेला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.