घरफोडी करून 50 हजारांचा ऐवज चोरीला

0
446

चाकण, दि. १४ जुलै (पीसीबी) – घरफोडी करून चोरट्यांनी 50 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 13) पहाटे सहा वाजताच्या सुमारास सुमित्रा रेसिडेन्सी चाकण येथे उघडकीस आली.

सुरेश लक्ष्मण चाफेकर (वय 30, रा. सुमित्रा रेसिडेन्सी चाकण. मूळ रा. सोलापूर) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. 12) रात्री साडेदहा ते गुरुवारी सकाळी सहा वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटाचे लॉक तोडून त्यातून 50 हजार 500 रुपये किमतीचे चांदीची साखळी, मिनी गंठण व सोन्याचे मणी असा ऐवज चोरून नेला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.