बावधन ,दि. २१(पीसीबी) : घरफोडी करून चोरट्यांनी घरातून पन्नास हजार रुपये रोख रक्कम आणि तीन लाख रुपयांचे दागिने असा एकूण साडेतीन लाखांचा ऐवज सोडून नेला. ही घटना 16 मार्च रोजी बावधन बुद्रुक येथे उघडकीस आली.
चंद्रशेखर मोतीलाल परदेशी (वय 61, रा. बावधन बुद्रुक, ता. मुळशी) यांनी या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिरण्यात दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी परदेशी यांचे घर 15 मार्च रोजी दुपारी तीन ते 16 मार्च रोजी सकाळी पावणे अकरा वाजताच्या सुमारास कुलूप लावून बंद होते. दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घराचे कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. देवघरातील लोखंडी कपाट उचकटून पन्नास हजार रुपये रोख रक्कम आणि तीन लाख रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.













































