घरफोडी करून पाऊण लाखाचे साहित्य चोरीला

0
256

चिंचवड, दि. ६ (पीसीबी) – घरपोडी करून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम असा 71 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 5) सकाळी चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी चिंचवड येथे उघडकीस आली.

नितीन अशोक गोसावी (वय 42, रा चिंतामणी चौक वाल्हेकरवाडी चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पत्नी रविवारी (दि. 4) दुपारी घराला कुलूप लावून फिर्यादी यांच्या बहिणीकडे डोंबिवली येथे गेल्या होत्या. त्यानंतर अज्ञात चोरट्याने घराचा कडीकोयंडा उचकटून आत प्रवेश केला. कपटात ठेवलेले 16 ग्रॅम वजनाचे सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम असा 71 हजार रुपयांचा आवाज चोरट्याने चोरून नेला. हा प्रकार सोमवारी सकाळी सात वाजता उघडकीस आला. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.