घरफोडी करून दोन लाखांचा ऐवज चोरीला

0
93

भोसरी, दि. 19 (पीसीबी) : घरफोडी करून दोन लाख सात हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना 10 ते 16 ऑक्टोबर दरम्यान सद्गुरूनगर, भोसरी येथे घडली.

विकास शिवाजी पवार (वय 27, रा. सद्गुरु नगर, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर कुलूप लावून बंद असताना 10 ते 16 ऑक्टोबर या कालावधीत अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून दोन लाख सात हजार रुपये किमतीचे पाच तोळे 600 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्याने चोरून नेले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.