घरफोडी करून दीड लाखांचा ऐवज केला लंपास

0
161

दि २० मे (पीसीबी ) – बंद घराचे कुलूप तोडून घरातील तब्बल दीड लाख रुपयांचा ऐवज चोराने चोरून नेला आहे. हि घटना थेरगाव येथे 12 ते 16 मे 2024 दरम्यान घडली आहे.

याप्रकरणी विवेक तुकाराम गंगावणे( वय 29 रा थेरगाव) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून अज्ञात चोरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे घर लॉक असताना आरोपीने घराचा कडी-कोंयडा तोडून घरात प्रवेश केला व घरातील कपाटामधून सोन्याचे दागिने व नऊ हजार रुपयांचे रोख रक्कम असा एकूण 1 लाख 46 हजार 865 रुपयांचा ऐवज चोरून नेला याप्रकरणी वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस चोराचा शोध घेत आहेत.