घरफोडी करून दीड लाखांचा ऐवज लंपास

0
294

निगडी, दि.१३ (पीसीबी)
दरवाजाचे कुलूप तोडून घरातून एक लाख ४० हजारांचे दागिने आणि रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. १२) मध्यरात्री दोन ते सकाळी साडेसात वाजताच्या कालावधीत बजाज ऑटो कॉलनी समोर, निगडी प्राधिकरण येथे घडली.

विनायक नानासाहेब रोकडे (वय ६९, रा. निगडी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोकडे यांचे घर कुलूप लावून बंद असताना अज्ञातांनी दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घराच्या किचनमध्ये असलेल्या लोखंडी कपटाचा दरवाजा उचकटून ८० हजारांचे दागिने आणि ६० हजार रुपये रोख रक्कम चोरटयांनी चोरून नेली. निगडी पोलीस तपास करीत आहेत