चिखली, दि. ७ (पीसीबी) – दरवाज्याचे लॅच लॉक तोडून चोरट्याने घरातून सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम असा एकूण तीन लाख पंधरा हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना मंगळवारी (दि. 6) दुपारी राजे शिवाजीनगर प्राधिकरण चिखली येथे उघडकीस आली.
नितीन धोंडीराम फडतरे (वय 42, रा. राजे शिवाजीनगर प्राधिकरण चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण सविता दशरथ शिंदे यांचे घर 29 ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या कालावधीत कुलूप लावून बंद होते. त्यांच्या घराच्या दरवाज्याचे लॅचलॉक चोरट्यांनी तोडले आणि घरात प्रवेश करून घरातील सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम असा एकूण तीन लाख पंधरा हजारांचा ऐवज चोरून नेला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.