घरफोडीत कारची चावी, बूट चोरीला

0
148

दिघी, दि. २९ (पीसीबी) -डुडुळगाव येथे घरफोडीचा एक प्रकार उघडकीस आला आहे. कॉमन टॉयलेटची काच तोडून चोरट्याने घरात प्रवेश करत कारची चावी, बूट आणि सॅक बॅग चोरून नेली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 26) रात्री उघडकीस आली.

संतोष कुंडलिक देवकुळे (वय 42, रा. डुडुळगाव, मोशी) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देवकुळे यांच्या घराच्या कॉमन टॉयलेटच्या खिडकीच्या काचा तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला. घरातून इनोव्हा कारची चावी, एक जोडी बूट आणि एक सॅक बॅग असा पाच हजार 600 रुपयांचा ऐवज चोरून नेला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.