घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल ,दोघांना अटक

0
293

देहुरोड, दि. ६ (पीसीबी) – घरगुती गॅसचा काळाबाजर केल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. तर यातील दोघांना देहुरोड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई देहुरोड पोलिसांनी रविवारी (दि.5) देहुरोड येथील विकास नगर परिसरात केली आहे.

पोलिसांनी विजय भाऊसाहेब कोकरे (वय 28 रा.देहुरोड) व अनिल बबन गडाळे (वय 24रा. देहुरोड) यांना अटक केली आहे. तर शशिकांत संजय मिटकरी (वय 23 रा.देहुरोड) व प्रशांत अशोक कारंडे (वय 19 रा. देहुरोड) यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे बेकायदेशीर रित्या कोणत्याही परवानगी शिवाय व कोण्यात्या ही सुरक्षितते शिवाय भरलेल्या सिलेंडर मधील गॅस रिकाम्या गॅस मध्ये भरत होते. यावेळी जिवीतास धोका होण्याची शक्यता श्ताना देखील आरोपी हे बेकायदेशीर कृत्य करत असल्याने देहुरोड पोलिसांनी दोघांना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.