घरगुती गॅसचा काळाबाजार केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा

0
482

भोसरी,दि.०३(पीसीबी) – भरलेल्या गॅस टाक्या मधून रिकाम्या टाक्या मध्ये गॅस भरणाऱ्या तरुणावर भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (दि.2) सकाळी भोसरीतील शांतीनगर झोपडपट्टी येथे उघडकीस आली.

यावरून भरत सुर्याजी मोरे (वय 23 रा.भोसरी) याच्यावर जिवानावश्यक वस्तू कायदा 1995 चे कलम 3,7 सह (पुरवठा आणि वितरण) नुसार गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हो कोणतीही सुरक्षिततेची काळजी न घेता शांतीनगर या झोपडपट्टीत भरलेल्या गॅस सिलेंडर मधून रिकाम्या सिलेंडरमध्ये गॅस भरत होता. यावेळी जिवीतास धोका होईल हे माहिती असताना देखील असे कृत्य केल्याने आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.