घरगुती कारणावरून मुलानेच केला आईचा खून, मुलाला अटक

0
679

देहूरोड, दि. १६ (पीसीबी) – घरगुती भांडणातून मुलाने 60 वर्षीय आईच्या डोक्यात लाकडी वासा घालून खून केला आहे. याप्रकरणी देहूरोड पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.14) रात्री मामुर्डी येथे घडली.

निळकंठ अश्रुबा शिंदे ( वय 41 रा मामुर्डी) असे अटक मुलाचे नाव आहे. देहूरोड पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी मोमीन सुलेमान शेख यांनी फिर्याद दिली आहे. कांताबाई आश्रुबा शिंदे (वय 60) असे मयत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी याने राहते घरी आई कांताबाई यांना कौटुंबिक कारणावरून भांडणात सुरुवात केली या भांडणात त्याने चौकोनी आकाराचा लाकडी वासा आईच्या डोक्यात मारला या त्या गंभीर जखमी झाल्या व त्यात त्यांचा मृत्यू झाला यावरून पोलिसांनी मुलाविरोधात कुणाचा गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.