घरगुती अवैध नळजोड 31 ऑगस्टपर्यंत नियमित करुन घ्या, अन्यथा गुन्हे दाखल करणार

0
343

पिंपरी दि. २७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी अवैध नळजोड 31 ऑगस्ट 2022 पर्यंत नियमित करुन घ्यावेत. नळजोड नियमित करण्यासाठी नागरी सुविधा केंद्रामध्ये अर्ज करावा. 31 ऑगस्टनंतर अवैध नळजोड तोडण्याची आणि गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्याचा इशारा महापालिका पाणीपुरवठा विभागाने दिला आहे.

महापालिकेने अवैध नळजोड नियमित करण्यासाठी विशेष मोहीम घेण्यात आली. या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद मिळावा, याकरिता घरगुती ग्राहकांकडून केवळ अनामत आणि दंडापोटी 5 हजार रुपये आकारण्यात येतात. या मोहिमेअंतर्गत 1 हजार 19 जणांचे नळजोड नियमित करण्यासाठी अर्ज आले आहेत. या योजनेला आता पुन्हा 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नागरिकांनी नळजोड नियमित करुन घ्यावेत.

नळजोड नियमित करणासाठी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हींग लायसन्स, पॅन कार्ड, मिळकत बिल, लाईट बिल यापैकी कोणतेही एक कागदपत्र पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. अधिक माहितीसाठी नागरिकांनी संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधावा. मुदतीनंतर महापालिका अवैध नळजोड तोडण्याची कारवाई करणार आहे. अवैधनळजोडधारकांवर गुन्हे दाखल केले जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे यांनी सांगितले.