घड्याळ आणि केकचे आमीष दाखवून तरुणाची नऊ लाखांची फसवणूक

0
1

तरुणाला घड्याळ आणि केक देण्याचे आमिष दाखवले. त्याच्याकडून वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे घेऊन ते परत न देता त्याच्या आई वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत ९ लाख ४१ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना १९ ऑगस्ट २०२५ ते २३ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत बन्सल सिटी सोसायटी, दिघी रोड, भोसरी येथे घडली.

या प्रकरणात ५२ वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आशु शैलेश खंडारे (१९, दिघी रोड, भोसरी) आणि ओमकार आवारे (संत तुकाराम नगर, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या मुलाला सुरुवातीला घड्याळ आणि केक देण्याचे आमीष दाखवून त्याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर धारदार कटरचा धाक दाखवून आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. या दहशतीखाली आरोपींनी मुलाला विविध बँक खात्यांवर पैसे पाठवण्यास भाग पाडले. यामध्ये फिर्यादीच्या बँक खात्यातून ६ लाख ६१ हजार रुपये आणि त्यांच्या सासऱ्यांच्या बँक खात्यातून २ लाख ८० हजार रुपये आरोपींच्या खात्यावर पाठवण्यास सांगितले. दिघी पोलीस तपास करत आहेत.