घटस्फोट दिल्याने साडूकडून मारहाण

0
143
crime

दि. 1 ऑगस्ट (पीसीबी) चाकण
घटस्फोट दिल्याच्या कारणावरून साडूने साडूला बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 30) रात्री साडे नऊ वाजता महात्मा फुले चौक, चाकण येथे घडली.

राहुल गजानन निकम (वय 33, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रमोद लक्ष्मण शिंपी (वय 40, रा. चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रमोद हा फिर्यादी यांचा साडू आहे. फिर्यादी यांनी त्यांच्या पत्नीसोबत घटस्फोट घेतला आहे. त्या रागातून प्रमोद याने फिर्यादी सोबत किरकोळ वाद घालून हाताने मारहाण करत शिवीगाळ केली. पान टपरी समोरील फायबरच्या बादलीने मारून फिर्यादीस दुखापत केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत