घटस्फोटित महिलेवर फेसबुक फ्रेंडने केला लैंगिक अत्याचा

0
313

हिंजवडी, दि. १९ (पीसीबी) – घटस्फोटित महिलेवर फेसबुक फ्रेंडने जवळीक साधत लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार जानेवारी २०१८ ते १९ जुलै २०२२ या कालावधीत सांगवी, विमाननगर, बालेवाडी येथे घडला.

अजय रमेश बोतालजी (वय ४७, रा. बिबवेवाडी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या फेसबुक फ्रेंडचे नाव आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा घटस्फोट झाला आहे. दरम्यान आरोपी आणि फिर्यादी यांची फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांशी ओळख झाली. त्याद्वारे आरोपीने फिर्यादींसोबत जवळीक साधून फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादीच्या घरी, हॉटेलवर नेऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.