घटस्‍फोटाच्‍या कारणावरून रॉडने मारहाण

0
113

दिघी, दि. २० (पीसीबी) : पत्‍नीला घटस्‍फोट देण्‍याच्‍या कारणावरून एका तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण करण्‍यात आली. ही घटना बुधवारी (दि. १८) सायंकाळी साडेसहा वाजताच्‍या सुमारास दिघी येथे घडली.

गजानन गोविंद भोसले (वय २६, रा. लोहगाव, पुणे) असे जखमी झालेल्‍या तरुणाचे नाव असून त्‍यांनी दिघी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मेहूणे शुभम सोमनाथ गराडे (वय २३, रा. परांडेनगर, दिघी), तानाजी तापकीर (वय ३८, रा. चर्‍होली) आणि महिला आरोपी यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांच्या पत्‍नीला घटस्‍फोट द्यावा, या कारणावरून शिवीगाळ करीत लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच तू पुन्‍हा आमच्‍या तावडीत सापडला तर तुला जीवे सोडणार नाही, अशी धमकी दिली. तसेच फिर्यादी यांच्‍या मित्रालाही धमकी दिली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.