पिंपरी, दि. १६ (पीसीबी) – दिवाळी सणामध्ये लक्ष्मीपुजन,पाडवा, भाऊबीज हे तीनदिवस महत्वाचे आहेत तर भाऊबीज हा अत्यंत बहिण भावाचा प्रेमाचा दिवस म्हणजे भाऊबीज .बहिण-भावाला औक्षण करते हाच तो दिवस परंतु धकाधकीच्या जीवनामध्ये बहिणीला भावाकडे जाता येते असे नाही. कारण आपल्या आरोग्याची काळजी घेणारे पिंपरी चिंचवड आरोग्य विभागातील खाजगी संस्थेमध्ये काम करणारे बरेच महिला घंटागाडी कर्मचारी असतात परंतु आपल्या प्रमाणे त्यांनी जर आठ दिवस ते दहा दिवस सुट्टी घेतली तर शहरातील नागरिकांचा आरोग्यचा प्रश्न गंभीर होऊ शकतो याचे गार्भीय असल्याने घंटागाडी कर्मचारी आपल्या शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे शहरात कुठेही कचरा साठू नये म्हणून नागरीकांची दिवाळी आनंदात जावी म्हणून स्वतः रजेवर न जाता” जनसेवा हीच ईश्वर सेवा “समजून कचरा संकलन करून आपले कर्तव्य पार पाडत असतात त्यांनाही भाऊबीज करण्याची ईच्छा असूनही त्या वेळेअभावी भाऊबीज करू शकत नाहीत ही खंत मनात राहू नये म्हणून सामाजिक कार्यकर्ते व शहरातील पहिले पती-पत्नी गुणवंत कामगार आण्णा जोगदंड व संगीता जोगदंड यांनी आपल्या परीसरातील घंटागाडीवर भाऊबीजेच्या दिवशी काम करणाऱ्या महीला कामगारांना भाऊबीज म्हणून साडी व मिठाई देऊन भाऊबीजेच्या दिवशी आनंद देण्याच्या छोटासा प्रयत्न केला ,त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाल्याचे यावेळी अण्णा जोगदंड यांनी सांगितले..