घंटागाडी कर्मचाऱ्यांना विशेष बक्षिस

0
146


पिंपरी, दि. ३०(पीसीबी) -या वर्षात घंटागाडी ठेकेदारांना विशेष बक्षिस देणेबाबत तसेच इतर विकासकामांसाठी येणा-या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची स्थायी समितीची बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह होते.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप तसेच विषयाशी संबंधित विभागप्रमुख आणि अधिकारी उपस्थित होते.मनपाचे पशुवैद्यकीय विभागास नविन दवाखान्यासाठी आवश्यक डिजिटल एक्स रे मशीन खरेदी करणेकामी येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे प्रभाग क्र. ७ भोसरी स्मशानभूमी व दशक्रिया घाटाची तसेच गव्हाणेवस्ती, आदिनाथ नगर व इतर परिसरातील त्याचसोबत गावठाण, शांती नगर, विकास कॉलनी व इतर ठिकाणी स्थापत्य “विषय दुरुस्ती व अनुषंगिक कामे करणेकामी येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

सन २०२३- २४ साठी यशवंतराव चव्हाण हॉस्पीटल मध्ये नविन लाँड्रीसाठी आवश्यक स्थापत्य विषयक कामे करणेकामी येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे प्रभाग क्र. ५ गवळी नगर येथील भोसरी दिघी शिव रस्ता व इत्यादी ठिकाणचे रस्ते डांबरीकरणाने सुधारणा करणे व विकसित करणेकामी येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे प्रभाग क्र. ७ येथील मनपाच्या विविध स्वच्छतागृहाची स्थापत्य विषयक दुरुस्तीची व अनुषंगिक कामे करणेकामी येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे वाय. सी. एम हॉस्पिटल येथे विस्तारीत दुसरा मजल्यावर, पदव्युतर पदवी अभ्यासक्रमासाठी तसेच नवीन शवागृह इमारतीसाठी फर्निचरची व्यवस्था करणे व उर्वरीत अनुषंगिक कामे करणेकामी येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

ड क्षेत्रीय कार्यक्षेत्रात सार्वजनिक शौचालयाचे यांत्रिकी पद्धतीने दिवसातून ४ वेळा साफसफाई करणे या निविधाधीन कामासाठी येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे प्रभाग क्र. ३ च-होली येथील विविध ठिकाणी स्थापत्य विषयक कामांची दुरुस्ती करणेकामी येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे रस्त्याचे विविध ठिकाणी दुतर्फा, मोकळ्या जागा येथे वृक्षारोपणासाठी मोठी रोपे पुरविणेबाबत,
मोशी येथील कचरा डेपो येथे मनपा शाळेतील विदयार्थ्यांची शैक्षणिक सहलीसाठी देण्यात आलेल्या बसेसच्या बिलाच्या येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

नाशिक फाटा येथील उड्डाणपुलाखालील नदीच्या बाजूला वाहतुक बेटाचे सुशोभीकरण करणे तर्गत विद्युत विषयक कामे करणेकामी येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे प्रभाग क्र. १५ मधील मनपा इमारतींचे दुरुस्तीची कामे करणेकामी येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड इमारती मधील कॉरिडॉर अंतर्गत व बाह्य परिसराची दैनंदिन साफसफाई व स्वच्छता करणेकामी येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे प्रभाग क्र. १०, १४ , १५ आणि १९ मधील सार्वजनिक शौचालयांची यांत्रीक पध्दतीने व मनुष्य बळाव्दारे दैनंदिन साफसफाई, देखभाल करणे करणेकामी येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे ड क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत पिंपळे निलख शाळा क्र. ५२ या इमारतीचे स्थापत्य विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणेकामी येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे प्रभाग क्र. २८ पिंपळे सौदागर येथील पिंपरी चिंचवड मनपाच्या शाळा इमारतीत स्थापत्य विषयक इतर अनुषंगिक कामे करणेकामी येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे प्रभाग क्र २४ थेरगाव येथील नाल्यांना बेडींग करणे, भिंतींची दुरुस्ती करणे व इतर अनुषंगिक कामे करणेकामी येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे ड क्षेत्रिय कार्यालय अंतर्गत कस्पटे वस्ती प्राथमिक शाळा क्र.५९ या इमारतीचे स्थापत्य विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करणेकामी येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

मनपाचे प्रभाग क्र. १९ गावडे कोलनी, उद्योगनगर, सुदर्शननगर व इतर परिसरामध्ये स्ट्रांग वोटर, कामे करणेकामी येणा-या खर्चास तसेच मनपाचे रस्ते आणि उद्याने सुशोभिकरणासाठी शोभिवंत रोपे पुरविणेबाबत, उद्यानांमध्ये लागवडी साठी शोभिवंत रोपे पुरविणेबाबत तसेच मनपाचे ई क्षेत्रीय कार्यालयातील विविध रस्ते, मध्य दुभाजक सुशोभिकरणाची देखभाल करणेकामी येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली.

केंद्र सरकारच्या शहरी मंत्रालयाने आयोजीत केलेल्या “विना वाहन वापर” उपक्रमांत अनेक महानगरपालिका, इतर संस्था सहभागी झाल्या होत्या. यामध्ये महापालिकेने शहरातील नागरिकांसाठी सायकल व पादचारी मार्गाचे सादरीकरण केले होते.त्यामधील निवडीनुसार काल दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात महापालिकेस प्रथम क्रमांकांचे पारितोषिक मिळाले.

त्याअनुषंगाने आज झालेल्या स्थायी समिती सभेत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील , विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. तसेच आयुक्त सिंह यांच्या हस्ते सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, उप अभियंता सुनील पवार, आय. टी. डी. पी चे प्रांजल कुलकर्णी, डिझाईन शाळाचे आशिक जैन, पी. डी. ए संस्थेचे प्रसन्न देसाई यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.