ग्लास फोडण्याचा जाब विचारल्याने मित्राला मारहाण

0
523

चाकण, दि. १४ (पीसीबी) : हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी आलेल्या ग्राहकाने हॉटेलमधील ग्लास फोडला. याचा जाब विचारला असता ग्राहकाने त्याच्या मित्राच्या डोक्यात बियरची बाटली फोडून त्यास जखमी केले. ही घटना शनिवारी (दि. 13) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास चाकण येथील मैफिल हॉटेल समोर घडली.

विकास किसन सरोज (वय 18, रा. राजगुरुनगर, ता. खेड) याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी समीर उत्तम काशीद (वय 20, रा. खरपुडी बुद्रुक, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी समीर आणि आरोपी विकास हे मैफिल हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले. जेवण करताना विकास याने काचेचे ग्लास फोडले. त्यामुळे समीर यांनी विकास याला ‘तू ग्लास का फोडले’ असे विचारले. त्या कारणावरून विकास याने समीर यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच तिथे पडलेली बियरची बाटली फोडून फिर्यादी यांच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.