ग्राहकाला बोलल्याच्या कारणावरून महिलेस जीवे मारण्याची धमकी

0
233

चिंचवड, दि. 11(पीसीबी) – ग्राहकाला बोलल्याच्या कारणावरून दोघांनी मिळून एका महिला जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना रविवारी (दि. 9) सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास चिंचवड येथे घडली.

मयूर रामप्रसाद शर्मा (वय 32, रा. चिंचवडगाव) आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 56 वर्षीय महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या दुकानात असताना आरोपी दोघेजण फिर्यादी यांच्या दुकानासमोर आले. माझ्या ग्राहकाला का बोललीस असे म्हणत मयूर याने फिर्यादीला मारवाडी भाषेतून शिवीगाळ केली. तसेच फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.