तळेगाव दाभाडे, दि. २७ (पीसीबी) – कचरा उचलण्याचे काम थांबवले म्हणून एका व्यक्तीने ग्रमापंचायत शिपायाला बॅटने मारहाण केली आहे. हा प्रकार 21 डिसेंबर रोजी जाबंवडे गावात झाला.
याप्रकरणी ग्रामसेवक महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.26) फिर्याद दिली आहे. त्यानुसार सचिन आनंदा शिंदे (रा. जाबंवडे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या ग्रेमसेवक असून ग्रामपंचयत शिपाई तुषार आनंदा भोसले हे गावातील पाण्याच्या टाकीजवळील कचरा जेसीबी व डंपरच्या सहाय्याने काढण्याचे काम करत होते. यावेळी सायंकाळी पाच वाजता काम थांबवले असता आरोपीने काम का थांबवले, काम तसेच चालु ठेवा, तुमच्या काय बापाचे जात आहे म्हणत तुषार भोसले यांना बॅटने मारहाण केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.