ग्रामपंचायत निवडणुकीसाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

0
235

निगडी, दि. १७ (पीसीबी) – ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी पैसे लागणार असल्याचे म्हणत विवाहाला माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. पैसे आणण्याच्या कारणावरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केला. ही पारकर जानेवारी २०२२ ते २८ मार्च २०२३ या कालावधीत अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे घडली.

पती विशाल कडू इंगळे, सासरे कडू शवराव इंगळे, नंदावा भाऊसाहेब देवरा गायकवाड आणि चार महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी २० वर्षीय विवाहितेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विशाल याला त्याच्या गावी ग्रामपंचायतची निवडणूक लढवायची होती. निवडणूक लढविण्यासाठी पैसे लागणार असल्याने विशाल आणि त्याच्या कुटुंबीयांनी फिर्यादी विवाहितेकडे माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली. त्यावरून विवाहितेला मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला. फिर्यादी आणि विशाल यांचा जानेवारी २०२२ मध्ये विवाह झाला होता. सासरच्यांनी पैशांची मागणी करून छळ सुरु केल्याने फिर्यादीने काही महिन्यातच माहेर गाठले. तरीही सासरच्यांचा त्रास कमी होत नसल्याने फिर्यादीने पोलिसात तक्रार दिली. निगडीचे पोलीस उपनिरीक्षक कुमार गिरीगोसावी तपास करीत आहेत.