ग्रामपंचायतीचा सदस्याची हत्या

0
1753

पुणे, दि. ८ (पीसीबी) – खेड तालुक्यातील सेझ प्रकल्पात असणाऱ्या कंपन्यामधील व्यावसायिक स्पर्धेतून कनेरसर ग्रामपंचायतीचा सदस्याची हत्या करण्यात आली आहे.या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संतोष रामदास दौंडकर (वय ३५, रा. कनेरसर, ता. खेड) असे हत्या झालेल्या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी 7 नंतर घडली.

खेड तालुक्यातील सेझ प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे काही प्रमाणात काम सुरू आहे. संतोष दौंडकर यांनी क्रेनचा व्यवसाय सुरू केला होता. त्यामुळे अनेक कंपन्यामध्ये क्रेन पुरविण्याचे काम ते करत होते. अत्यंत कमी कालावधीत त्यांनी व्यवसायात यश मिळवत व्यवसाय वाढवला होता. संतोष हे काल शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास कंपनीच्या गोडाऊनजवळ असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार हत्याराने वार केले. संतोष यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या हाताचा अंगठा तुटून पडला. हल्लेखोर हल्ला करतच होते. आपला बचाव करण्यासाठी पळत असताना हल्लेखोरांनी त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर वार केले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही हत्या सराईत गुन्हेगारांनी केला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.