गौरी ऐवजी जिजाऊ सावित्रीचे पूजन

0
312

काडीवडगांव,दि.२३(पीसीबी) – शकूंतला बादाडे,संतोष बादाडे, समिक्षा बादाडे,आणि मुलगी शिवराई बादाडे या यांच्या बादाडे कुटुंबाने,समाजातील रुंढी परंपरेला फाटा देत त्यांच्या मूळगावी काडीवडगांव येथे आधुनिक गौरी पूजनाची परंपरा जोपसली आहे. ते गौरी ऐवजी जिजाऊ सावित्रीचे पूजन भक्ती भावाने करतात,त्यांच्याच विचारांने आयुष्यात जडणघडण होते. ह. मू. संभाजीनगर चिंचवड, पुणे येथील शिवश्री संतोष बादाडे हे महापुरुषांच्या विचारांचे असून त्यांनी पारंपरिक गौरीपूजनऐवजी पुरोगामी गौरीपूजन केले. गौरी पूजनला आकर्षक सजावट करून बादाडे कुटुंब मनोभावे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. हा सण साजरा करण्यासाठी बादाडे कुटुबांची काही दिवसांपासून लगबग सुरू असते.

हे गौरीपूजन परिसरात मोठे आकर्षण असून ते पाहण्यासाठी अनेक जण दूरवरून येतात. बादाडे कुटुंबावर महापुरुषांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे. त्यांनी हुंडा न घेता, कुठलेही कर्मकांड न करतात, शिवधर्म पध्दतीने स्वतःचा विवाह केला आहे. पंचांग मुहूर्त भविष्य इतर रुढी परंपरा अंधश्रध्दा आणि कर्मकाडांना त्यांनी आपल्या जीवनातून पुर्णत: मुठमाती दिली आहे. यांच्या विचारांची व वैचारिक विचारांनूसार वागण्याची परिसरात मोठी चर्चा असते. सामाजिक संदेश देण्यासाठी समाजाला वास्तववादी दिशा देणाऱ्या राजमाता मॉसाहेब जिजाऊ,सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमा महालक्ष्मी च्या ठिकाणी स्थापन करून बादाडे परिवारांच्या वतीने सर्व मराठा ओबीसी बहूजनांना समतेचा व परिवर्तनेचा सामाजिक संदेश दिला आहे. या सामाजिक परिवर्तना करिता तथागत गौतम बुध्द जगद्गुरू तुकोबाराय छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले छत्रपती शाहू महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर आण्णाभाऊ साठे संत गाडगेबाबा संत तुकडोजी महाराज आणि शहिद भगतसिंग यांच्या सामाजिक कार्याची प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात प्रथमच अशा स्वरुपात थोर मातांचा सन्मान महालक्ष्मी म्हणून करण्यात आला असून या आगळ्या वेगळ्या गौराई स्थापनेबद्दल बादाडे परिवारांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

यासाठी बादाडे परिवारांच्या जवळील,प्रमोद करांडे,सत्यप्रेम करांडे गोरख करांडे,नवनाथ करांडे आणि शिवश्री नितीन वैराळ रा.वरदडी,मेहकर जि. बुलढाणा यांनी या करीता विशेष योगदान दिले.या आगळ्या वेगळ्या गौराई पाहण्यासाठी विद्यार्थी व महिला ग्रामस्थांनी गर्दी केली असून आणि बादाडे परिवारांच्या घरी येणाऱ्या प्रत्येकाला जिजाऊ सावित्रीचे चरित्र पुस्तक शिवभेट देऊन मॉसाहेब जिजाऊ आणि सावित्रीमाई च्या विचारांची जनजागृती देखील केली आहे. आणि त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे..