गौतमी पाटील हिच्या वडिलांचं निधन

0
523

पुणे,दि.०५(पीसीबी) – गौतमी पाटील हिच्या वडिलांचं आज निधन झाले. काही दिवसांपूर्वी ते धुळ्यात बेवारस अवस्थेत सापडले होते. आज (सोमवार) निधन झालंय. रवींद्र बाबुराव पाटील, असं गौतमी पाटील हिच्या वडिलांचे नाव आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं होतं.

खिशात असलेल्या आधार कार्डवरुन त्यांची ओळख पटली होती. ते गौतमी पाटीलचे वडील असल्याचं समोर आलं होतं. ही बातमी गौतमीपर्यंत पोहोचल्यानंतर तिनं वडिलांना मदत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर गौतमी पाटीलने वडिलांची जबाबदारी घेत त्यांना उपचारासाठी पुण्यात दाखल केलं होतं. यावेळी तिनं वडिलांच्या उपचारासाठी शक्य तितके प्रयत्न करणार असल्याचं देखील म्हटलं होतं. रवींद्र पाटील यांना दारुचं व्यसन होतं. या व्यसनामुळेच गौतमीची आई तिला घेऊन पुण्याला गेली होती. गौतमी पुण्यातच लहानाची मोठी झाली.

गौतमीने वडिलांना पुण्यातील चिंतामणी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, आज सोमवारी ३ वाजता त्यांचं रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. गौतमी पाटीलच्या वडिलांच्या दोन्ही किडन्या आणि लिव्हर निकामी झाले होते. आज त्यांच्यावर पुण्यातील धनकवडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.