गोमांस वाहतूक प्रकरणी तिघांना अटक

0
263

निगडी, दि. २४ (पीसीबी) – विक्रीसाठी गोमांस वाहतूक करणाऱ्या एका रिक्षा चालाकला आणि दोन दुकानदारांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 23) सकाळी साडेआठ वाजता भक्ती शक्ती चौक येथे करण्यात आली.

जिलानी बशीर सिद्दिकी (वय 20, रा. पिंपरीगाव), शकील मुसा कुरेशी (वय 60, रा. पिंपरी), शहबाज शकील कुरेशी (वय 24, रा. पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस नाईक अमोल खुडे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सिद्दिकी याने त्याच्या रिक्षातून गोमांसची वाहतूक केली. हा प्रकार रविवारी सकाळी साडेआठ वाजता उघडकीस आला. सिद्दिकी याने शकील आणि शहबाज याच्या दुकानात विक्रीसाठी गोमांसाची वाहतूक केली असल्याचे पोलीस तपासात समोर आल्याने त्या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. निगडी पोलीस तपास करीत आहेत.