गोपिनीय पिन पाहून एटीएमची अदलाबदल करत वृद्धाची फसवणूक

0
264

आळंदी, दि. २८ (पीसीबी) – एटीएम सेंटरमध्ये खात्यावरील रक्कम तपासण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा एटीएम गोपनीय पिन पाहून एटीएमची अदलाबदल केली. त्यानंतर वृद्धाच्या बँक खात्यातून पैसे काढून घेत फसवणूक केली. हा प्रकार शनिवारी (दि. 27) दुपारी दीड वाजताच्या सुमारास आळंदी-मरकळ रोडवर हिताची एटीएम सेंटरमध्ये घडला.

सुरेश नारायण बागड (वय 62, रा. आळंदी, ता. खेड) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बागड हे आळंदी-मरकळ रोडवरील हिताची एटीएम मध्ये बँक खात्यातील शिल्लक रक्कम तपासण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागे उभा असलेल्या एका अनोळखी व्यक्तीची त्यांनी मदत घेतली. दरम्यान, फिर्यादी एटीएमचा व्यवहार करत असताना त्याने मदतीच्या बहाण्याने फिर्यादी यांच्या एटीएम कार्डचा गोपनीय पिन पाहिला. त्यानंतर फिर्यादी यांच्या एटीएम कार्डची अदलाबदल केली. फिर्यादी यांच्या एटीएम कार्ड द्वारे त्यांच्या खात्यातून तब्बल 60 हजार रुपये काढून घेत आरोपीने फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.