गोडाऊन समोर पार्क केलेली इको गाडी चोरीला

0
251

मोशी, दि. ८ (पीसीबी) – मोशी परिसरातील सस्तेवाडी येथे एका गोडाऊन समोर पार्क केलेली इको गाडी अज्ञातांनी चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 5) सकाळी उघडकीस आली.

संतोष कारभारी साळवे (वय 39, रा. मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साळवे यांनी त्यांची एक लाख रुपये किमतीची इको गाडी (एमएच 14/सीएक्स 1816) सस्तेवाडी येथील तेजस्विनी इंटरप्रायजेस या गोडाऊन समोर पार्क केली. रात्रीच्या वेळी अज्ञातांनी साळवे यांची गाडी चोरून नेली. शुक्रवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.