गोडाऊन समोर पार्क केलेली मोपेड दुचाकी चोरीला

0
475

चाकण, दि. ६ (पीसीबी) – गोडाऊन समोर पार्क केलेली मोपेड दुचाकी अज्ञात चोरट्याने भर दिवसा चोरून नेली. ही घटना 22 मे रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास वाकी खुर्द ता. खेड येथे घडली.

योगेश भगवान पवार (वय 31, रा. चाकण) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. 5) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची 72 हजार 500 रुपये किमतीची पासिंग न झालेली मोपेड दुचाकी वाकी खुर्द येथील गोडाऊनच्या मोकळ्या जागेत पार्क केली होती. 22 मे रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांची दुचाकी चोरून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.