गोडाऊन मधून 25 लाखांचे टीव्ही चोरीला

0
445

खेड, दि. २४ जुलै (पीसीबी) – खेड तालुक्यातील कुरुळी येथे एका गोडाऊन मधून चोरट्यांनी तब्बल 25 लाख रुपयांचे टीव्ही चोरून नेले. हा प्रकार रविवारी (दि. 23) सकाळी उघडकीस आला.

गोविंदराम रत्नलाल माळी (वय 38, रा. चाकण) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कुरुळी गावात एम आर सूर्य इलेक्ट्रॉनिक्स इंडिया प्रायवेट लिमिटेड कंपनीचे गोडाऊन आले. शनिवारी रात्री नऊ वाजताच्या सुमरास फिर्यादी यांनी गोडाऊन कुलूप लाऊन बंद केले. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे शटर उचकटून आत प्रवेश करत 25 लाख 17 हजार 87 रुपये किमतीचे एलईडी टीव्ही चोरून नेले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.