गेल्या ६० वर्षांत सत्तेतून पैसा आणि पैश्यातून सत्ता

0
246

पुणे, दि. १७ (पीसीबी) – देशाच्या राजकारणात भाजप वेगवेगळ्या पातळीवर सक्रियपणे काम करत आहे. शहर ते गाव पातळीपर्यंत भाजपच्या नेत्यांकडून संवाद साधून पक्ष वाढीसाठी मोठ्या प्रमाणात काम केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता भाजपची संवाद बैठका सुरु आहेत. या अशा विविध कार्यक्रमामुळेच भाजप आता राजकारणात वेगवेगळे प्रयोग करतानाही दिसून येत आहे. त्यामुळेच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या संवाद बैठकीत त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल करताना त्यांनी गेल्या 60 वर्षातील हिशोब मांडत काँग्रेस पक्षाला त्यांनी आरोपीच्या पिंजऱ्यातच उभा करताना दिसले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना भाजपचा इतिहास सांगत असताना त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला.

त्यावेळी त्यांनी त्यांच्यावर गंभीर आरोप करत काँग्रेसने गेल्या साठ वर्षात देशाचा आणि राज्याचा विकास न करता त्यांनी फक्त घोटाळा करुन नेत्यांनी स्वतः मोठं व्हायचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी म्हटले. गेल्या 60 वर्षात काँग्रेस नेत्यांनी मतं घेतली मात्र त्याचा उपयोग काय झाला? असा सवालही त्यांनी काँग्रेसला केला आहे. सत्तेतून पैसा आणि पैश्यातून सत्ता हाच एकमेव अजेंडा काँग्रेसने देशात राबवला होता असा घणाघातही त्यांनी काँग्रेसवर केला आहे.
काँग्रेस हद्दपार, भाजप सत्तेत

त्याच बरोबर काँग्रेसने सत्ता उपभोगलीच मात्र त्याचवेळी समाजात तेढ निर्माण करुन सत्ता उपभोगण्याचे पापही काँग्रेसनेच केले असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. आणि हाच त्यांचा अजेंडा होता, व तोच त्यांचा जाहीरनामाही होता अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे. त्यामुळे आता राज्यात काँग्रेसला हद्दपार करुन भाजप सत्तेत आणण्यास देवेंद्र फडणवीस यांचे मोठे योगदान असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेससह राहुल गांधी यांच्यावरही त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे. कर्नाटकमध्ये राहुल गांधींनी आदेश काढला आणि सावरकरांचे पुस्तकं काढून टाकली आहेत. काँग्रेसला दिलेले एक मत किती चूक आहे, धर्मांतर बंदी कायदा कर्नाटकमध्ये रद्द करण्यात आला आहे. त्याच बरोबर कर्नाटकमध्ये गोहत्या बंदी कायदाही आता रद्द करणार आहेत असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला आहे.