दि २६ मे (पीसीबी ) – गुजरातमधील राजकोट येथे गेमझोनमध्ये लागलेल्या आगीत 12 मुलांसह 32 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडलीये. तर, 10 जणांना वाचवण्यात यश मिळालंय.या ठिकाणी अजूनही काही जण अडकल्याची माहिती समोर येत आहे.या अग्नितांडवात गेमझोन जळून खाक झालाय.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झालं आणि बचावकार्य करण्यात आलं. याठिकाणी पेट्रोल आणि डिझेलचा मोठा साठाही असल्याची माहिती समोर आलीये.अग्नितांडवात 32 जणांचा होरपळून मृत्यूकाही मीडिया रिपोर्टनुसार या भीषण आगीत 9 चिमुकल्यांसह 32 जणांचा मृत्यू झालाय. आग लागली त्यावेळी गेमिंग झोनमध्ये मोठ्या संख्येनं लोक उपस्थित होते. शनिवार सुट्टीचा दिवस असल्याने येथे 99 रुपयांची स्पेशल ऑफर देखील ठेवण्यात आली होती. मात्र, हा सुट्टीचा आनंदाचा दिवस असा स्मशान शांतता देणारा ठरला.या ठिकाणी गो कार रेसिंगसाठी 1500 ते 2 हजार लिटर डिझेल आणि 1000 ते 1500 लिटर पेट्रोल गेम झोनमध्ये साठवलं जात असल्याचंही समोर आलंय. त्यात गेम झोनमधून बाहेर पडण्यासाठी आणि आत जाण्यासाठी 6 ते 7 फुटांचा एकच मार्ग होता. स्पेशल ऑफर असल्याने मोठ्या संख्येनं लोक येथे उपस्थित होते.