गॅस सिलिंडर घेतल्‍याचा जाब विचारत दोघांना मारहाण

0
120

आळंदी, दि. २० (पीसीबी) :  गॅस सिलिंडर घेतल्‍याचा जाब विचारत महिला आणि अन्‍य एकाला मारहाण केली. ही घटना बुधवारी (दि. १८) सकाळी नऊ वाजताच्‍या सुमारास केळगाव, आळंदी येथील बापदेव चौकात घडली.

याप्रकरणी जखमी महिलेने आळंदी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हिरालाल भास्‍कर तायडे (वय ३२), नितीन शिवाजी पाटील (दोघेही रा. गोपाळपुरा धर्मशाळा, आळंदी), ज्ञानेश्‍वर ऊर्फ माऊली विठोबा क्षिरसागर (वय ३१, रा. केळगाव, ता. खेड, जि. पुणे) आणि दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून जमाव जमवून दोन महिला आरोपींनी गॅस सिलिंडर घेतल्‍याचा जाब विचारत लाथा बुक्‍क्‍यांनी तसेच चपलेने फिर्यादी यांना मारहाण केली. तसेच केस ओढले. फिर्यादी यांना सोडविण्‍यासाठी आलेला मुलगा ज्ञानेश्‍वर यालाही इतर पुरूष आरोपींनी मारहाण केली. आळंदी पोलीस तपास करीत आहेत.