गॅस रिफिलिंग प्रकरणी दोघांना अटक

0
133

चिखली दि. २५ (पीसीबी) – बेकायदेशीरपणे गॅस रिफिलींग केल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकने दोघांना अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 23) चिखली येथे करण्यात आली.

भुजंगनाथ दिलीप पाटील (वय 28, रा. चिखली), संभाजी बालाजी उपासे (वय 24, रा. चिखली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार सोमनाथ बोऱ्हाडे यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरलेल्या गॅस सिलेंडर मधून रिकाम्या गॅस सिलेंडर मध्ये बेकायदेशीरपणे कोणतीही सुरक्षितता न बाळगता गॅस रिफील करण्याचा प्रकार चिखली येथे उघडकीस आला. गुन्हे शाखेला याबाबत माहिती मिळाल्यानंतर कारवाई करत 116 सिलेंडर टाक्या, तीन गॅस रिफिलिंग सर्किट, एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण एक लाख 96 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.