गॅस बिल अपडेट करून देण्याच्या बहाण्याने पाच लाखांची फसवणूक

0
152

सांगवी , दि. 29 – गॅस बिल अपडेट करून देण्याच्या बहाण्याने वृद्ध व्यक्तीची पाच लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 19 जून रोजी सायंकाळी सांगवी येथे घडली.

याप्रकरणी 68 वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तीने फिर्यादीस फोन करून तो एमएनजीएल गॅस कंपनीतून बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादी यांचे गॅस बिल अपडेट करून देतो, असे सांगून त्याने फिर्यादी यांच्या बँक खात्यातून चार लाख 99 हजार 106 रुपये ट्रान्सफर करुन घेत फसवणूक केली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.