गॅस पाइपलाइन फुटली, अग्नितांडव

0
411

पुणे, दि. २८ (पीसीबी) – पुण्यातील कोंढवा परिसरातील पारगे नगरमध्ये महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (MNGL एक्स) ची गॅस पाइपलाइन फुटली आहे. त्यामुळे, मोठी आग लागली आहे. आज दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली आहे. पारगे नगरजवळ एका बांधकाम साईटचा रस्ता खोदण्याचे काम सुरू होते. या दरम्यान, खोदकामामुळेच पाइपलाइन फुटल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

पारगे नगरजवळ एका बांधकाम साईटचा रस्ता खोदण्याचे काम सुरू होते. यावेळी अनवधानाने खोदण्याच्या मशीनने पाइपलाइनचे नुकसान झाले. गॅस पाइपलाइन असल्याने फुटताच आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. त्यानंतर आग यशस्वीरित्या आटोक्यात आणण्यात आली आहे.

या दरम्यान, खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्यामुळे पुढील २ ते ३ तास संबंधित परिसरातील वीजपुरवठा बंद राहणार आहे. विशेष म्हणजे, गॅस सेवांमध्ये कोणतेही महत्त्वपूर्ण व्यत्यय आलेला नाही. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बाधित भागात तात्काळ पाण्याचा मारा देखील करण्यात आला आहे.