गॅस दरवाढीच्या विरोधात “कॉंग्रेस”चे शहरात आंदोलन

0
364

पिंपरी, दि.१० (पीसीबी) – केंद्र सरकारने घरगुती गॅस किमतीत ५० रुपये वाढ केल्याने सध्या गॅसची किमत १०५३ रुपये झाली असून याची सर्व सामान्य नागरिकांना झळ सोसावी लागत आहे. याच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात शनिवार (दि. ०९ जुलै २०२२) अनुक्रमे पिंपरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळया समोर, काळेवाडी एम. एम. हायस्कूल चौक, भोसरी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, लांडेवाडी चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आली.

शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली आणि महिला अध्यक्षा सायली नढे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही विधानसभा मतदार संघात गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी युवक अध्यक्ष कौस्तुब नवले, वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, सेवादल अध्यक्ष विरेन्द्र गायकवाड, सहकार सेल अध्यक्ष के. हरिनारायण, एनएसयूआय प्रदेश उपाध्यक्ष अॅड. उमेश खंदारे, माजी नगरसेविका निर्मला कदम, छायावती देसले, डॉ. मनिषा गरूड, पिंपरी ब्लॉक अध्यक्ष विश्वनाथ जगताप, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, भोसरी ब्लॉक अध्यक्ष विठ्ठल शिंदे, सज्जी वर्की, बी. बी. शिंदे, झेव्हिअर अंथोनी, विजय ओव्हाळ, मिलिंद फडतरे, उमेश बनसोडे, पांडुरंग जगताप, स्वाती शिंदे, भारती घाग, नंदाताई तुळसे, निर्मल खेरे, प्रियंका कदम (मलशेट्टी,) चंद्रकांत उमरगीकर, आबा खराडे, किरण खाजेकर, हिराचंद जाधव, नितीन खोजकर, अण्णा कसबे, आकाश शिंदे, बाबा बनसोडे, गौतम ओव्हाळ, दीपक भंडारी, सतीश भोसले, बाबा वाघमारे, महानंदा कसबे, सचिन पवार, चिदानंद जमादार, निवृत्ती भोसले, तात्या कांबळे, मनोज खवळे, समाधान दगडे, भारती चांदणे, अंबादास शिंदे, रमेश काकडे, नरेंद्र अहिरे, वैशाली शिंदे, राजू वायसे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.